Friday 6 August 2021

Child Labour Rescue and Rehabilitation Workshop

 

 प्रिय सहकारी,

सप्रेम नमस्ते !!!

    आपण गेल्या महिन्यामध्ये "बालविवाह" या विषयावर कार्यशाळा घेतली होती. आपण सर्वांचा या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. याच धर्तीवर आपण "बालमजुरी" या विषयावर कार्यशाळा आयोजित करत आहोत.

    आपण सगळे जाणता लॉकडाऊन परिस्थितीमध्ये शाळा बंद आहे. त्यामुळे मुले बालमजुरीच्या विळख्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी लहान मुल काम करत असेल तर सामाजिक संस्था वा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय भूमिका घेतली पाहिजे ?

    मुलांबरोबर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांसाठी आर्कच्या माध्यमातून "बालमजुरीतून बालकांची मुक्तता व पुनर्वसन" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करत आहोत. बुधवार, १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वा. ऑनलाईन  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

    सदर कार्यशाळेमध्ये किशोरवयीन मुलांसोबत काम करणारे अनुभवी कार्यकर्ते आपला अनुभव मांडतील. तसेच पेन्सिल पोर्टलचे  सादरीकरण करण्यात येईल.

कार्यशाळा - बालमजुरीतून बालकांची मुक्तता व पुनर्वसन
August 18, 2021, 11:00pm - 1:00pm
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/gen-rrbp-hsn

धन्यवाद,
सुशांत आशा 
9011029110 / 7066138138

Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...