Monday 22 November 2021

Children's Manifesto Media Coverage

 

बालकांच्या मागण्यांचा जाहीरनामा


दिव्य मराठी : मुलांनी जाहीर केला मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा


दै. लोकमत : नगरसेवक काका... पुस्तके, गणवेश द्या, व्यायामशाळा उभारा!


दै. लोकसत्ता : आगामी महापालिका निवडणुकीसाठी वस्त्यांमधील मुलांचा जाहीरनामा


दै. प्रभात : पालिका निवडणुकीसाठी बालकांचाही जाहीरनामा


दै. पुढारी : नगरसेवक काका, आमच्यासाठी हे कराल का?


दै. सामना : मुलांसाठी नाट्यगृहे, मनोरंजन केंद्रे उभारावीत


दै. सकाळ : चोवीस तास पाणी अन् हवी आरोग्य सुविधा



Saturday 20 November 2021

Children's Manifesto for Pune Elections Launched at Press Conference on World Child Rights Day



पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ साठी मुलांच्या मागण्यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

पुणे : जागतिक बालहक्क दिनाचे (२० नोव्हेंबर) औचित्य साधून पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या बालकांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अपेक्षित असणाऱ्या मागण्यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. शनिवारी पत्रकार भवन येथे 'बालहक्क कृती समिती'च्या बालकांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

बालहक्कांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध देशांनी एकत्र येऊन 'युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ दी चाईल्ड' अर्थात UNCRC हा महत्वपूर्ण करार २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी मान्य केला. मूल कुणाला म्हणावे, त्यांना नेमके कोणते हक्क असतात, आणि सहभागी देशांमधील संबंधित सरकारांनी नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याबाबत स्पष्टीकरण UNCRC मध्ये देण्यात आलेले आहे. हे सर्व हक्क एकमेकांशी संबंधित असून, यापैकी प्रत्येक हक्काचे समान महत्व आहे आणि मुलांना या हक्कांपासून कुणीही वंचित ठेऊ शकत नाही, अशी या कराराची संकल्पना आहे. या कराराच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून पाळला जातो.

UNCRC च्या भारतातील अंमलबजावणीसाठी शासनाकडे स्थानिक पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी 'बालहक्क कृती समिती' (Action for the Rights of the Child - ARC) हे बालहक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचे व्यासपीठ ३० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले. तेव्हापासून पुण्यातील बालकांच्या शिक्षण, संरक्षण, सहभाग, तसेच बालमजुरी व बालविवाह अशा सर्व प्रश्नांवर 'बालहक्क कृती समिती' काम करीत आहे.

बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून बालकांच्या जाहिरनाम्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या जाहीरनाम्यामध्ये मुलांच्या शिक्षण, आरोग्य, मनोरंजन तसेच संरक्षणासंदर्भातील २२ मागण्यांचा समावेश आहे. जाहिरनामा निर्मिती प्रक्रियेमध्ये पुणे शहरातील १०० मुलांनी सहभाग घेतला आहे. 

मुलांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन, चर्चा करून आपल्या मागण्यांची यादी तयार केली आहे. सदर मागण्या नियोजित निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘बालहक्क कृती समिती’ प्रयत्न करणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा. धन्यवाद!

आपले नम्र,
बालहक्क कृती समिती (आर्क), पुणे. 
 ९०११०२९११० / ९८२२४०१२४६ 




Monday 8 November 2021

Children's Manifesto Making Process



मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा

पुणे महानगरपालिकेच्या नियोजित निवडणुका (वर्ष २०२२) अनुषंगाने 'बालहक्क कृती समिती' (आर्क) मार्फत मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा (मॅनिफेस्टो) तयार करण्याबाबत सर्वसाधारण सभा दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी चर्चा झाली होती.

मॅनिफेस्टो तयार करण्याच्या कामामध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या संस्था व कार्यकर्त्यांनी नावे नोंदवल्यानंतर दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी पहिली व दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दुसरी बैठक घेण्यात आली.

दि. २७ ते २९ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान हडपसर, येरवडा, सिंहगड रोड अशा काही ठिकाणी मुले व युवकांच्या बैठका घेण्यात आल्या. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मनोरंजन, जनजागृती, अशा मुद्यांवर चर्चा करून एकूण सुमारे १०० मुलांनी आपल्या  मागण्या सादर केल्या.

पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्याचे सोप्या भाषेत सादरीकरण करणाऱ्या 'पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन' यांच्या विचारगट बैठकीमध्ये दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सहभाग घेऊन, मुलांच्या मागण्यांना अर्थसंकल्पीय तरतुदींशी कसे जोडता येईल यावर चर्चा करण्यात आली.

'बालहक्क कृती समिती' (आर्क) सोबत काम करीत असलेल्या स्वयंसेवकांच्या मदतीने या सर्व मागण्या एकत्र करण्याचे आणि मराठीमध्ये जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु आहे. १४ नोव्हेंबर बालदिन आणि बालहक्क सप्ताहादरम्यान हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार झाल्यावर खालील घटकांपर्यंत पोहोचविला जाईल -
• राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार;
• वस्तीपातळीवरील पालक, मुले, युवक, आणि सर्वसाधारण नागरिक;
• पत्रकार परिषद / प्रेसनोट याद्वारे माध्यमांचे प्रतिनिधी;
• सोशल मिडीयाद्वारे सर्व स्तरातील नागरिक.

या सर्व टप्प्यांवर आपल्या संस्थेचे व व्यक्तिशः आपले सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. पुढच्या टप्प्यांवर मर्यादीत वेळेत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आपल्या सूचना व तयारी जरूर कळवावी. पुढील अपडेट लवकरच कळवू...

धन्यवाद!
मंदार शिंदे
९८२२४०१२४६
बालहक्क कृती समिती (आर्क) पुणे





Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...