मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा
पुणे महानगरपालिकेच्या नियोजित निवडणुका (वर्ष २०२२) अनुषंगाने 'बालहक्क कृती समिती' (आर्क) मार्फत मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा (मॅनिफेस्टो) तयार करण्याबाबत सर्वसाधारण सभा दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी चर्चा झाली होती.
मॅनिफेस्टो तयार करण्याच्या कामामध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या संस्था व कार्यकर्त्यांनी नावे नोंदवल्यानंतर दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी पहिली व दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दुसरी बैठक घेण्यात आली.
दि. २७ ते २९ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान हडपसर, येरवडा, सिंहगड रोड अशा काही ठिकाणी मुले व युवकांच्या बैठका घेण्यात आल्या. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मनोरंजन, जनजागृती, अशा मुद्यांवर चर्चा करून एकूण सुमारे १०० मुलांनी आपल्या मागण्या सादर केल्या.
पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्याचे सोप्या भाषेत सादरीकरण करणाऱ्या 'पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन' यांच्या विचारगट बैठकीमध्ये दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी सहभाग घेऊन, मुलांच्या मागण्यांना अर्थसंकल्पीय तरतुदींशी कसे जोडता येईल यावर चर्चा करण्यात आली.
'बालहक्क कृती समिती' (आर्क) सोबत काम करीत असलेल्या स्वयंसेवकांच्या मदतीने या सर्व मागण्या एकत्र करण्याचे आणि मराठीमध्ये जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु आहे. १४ नोव्हेंबर बालदिन आणि बालहक्क सप्ताहादरम्यान हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार झाल्यावर खालील घटकांपर्यंत पोहोचविला जाईल -
• राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार;
• वस्तीपातळीवरील पालक, मुले, युवक, आणि सर्वसाधारण नागरिक;
• पत्रकार परिषद / प्रेसनोट याद्वारे माध्यमांचे प्रतिनिधी;
• सोशल मिडीयाद्वारे सर्व स्तरातील नागरिक.
या सर्व टप्प्यांवर आपल्या संस्थेचे व व्यक्तिशः आपले सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. पुढच्या टप्प्यांवर मर्यादीत वेळेत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आपल्या सूचना व तयारी जरूर कळवावी. पुढील अपडेट लवकरच कळवू...
धन्यवाद!
मंदार शिंदे
९८२२४०१२४६
बालहक्क कृती समिती (आर्क) पुणे