Thursday, 15 July 2021

Workshop on Child Marriage Prevention



प्रिय सहकारी,

सप्रेम  नमस्ते !!!


आपण सगळे जाणता कि सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये शाळा बंद आहेत आणि  अनेक पालक बेरोजगार झाले असल्याने बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बालविवाह होऊ नये यासाठी जनजागृती करतच आहोत.


मात्र बऱ्याच वेळा आपल्याला बालविवाहाच्या घटना समजतात आणि त्या रिपोर्ट केल्या जात नाही असेही दिसून येते. एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असेल अथवा बालविवाहाची शक्यता असेल तर सामाजिक संस्था  वा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली काय भूमिका असायला पाहिजे ? या विषयावर आपण चर्चासत्र घेत आहोत.


सदर चर्चासत्रामध्ये बालविवाह थांबविण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते मार्गदर्शन करतीलच तसेच कार्यकर्ता / सामाजिक संस्था म्हणून बालविवाह होत असतांना आपली काय भूमिका असली पाहिजे ?  हे निश्चित केले जाईल. आर्क ( बालहक्क कृती समितीच्या ) सर्व सदस्यांना विशेषतः ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करत आहोत कि या चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा. 


विषय : बालविवाह होत असल्याचे / झाल्याचे समजल्यास सामाजिक कार्यकर्त्यांची / सामाजिक संस्थांची भूमिका 

दिनांक: २१ जुलै २०२१ 

वेळ: सकाळी ११.००  ते दु . १.०० 

गुगल मिट लिंक: Workshop on child marriage

Wednesday, July 21 · 11:00am – 1:00pm
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/ezc-qgyw-vbu


धन्यवाद,

सुशांत आशा ( समन्वयक - आर्क )
मंदार शिंदे  ( संयोजक - आर्क )
9011029110 / 7066138138


1 comment:

  1. google meet vr join limit aslya mule kahi lokana join krta ala nhi pudhlya veles webinar he zoom vr ghetle jave ashi vinanti ahe aplya kde

    ReplyDelete

Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...