दि. ११/०४/२०२३
प्रति,
मा. जिल्हादंडाधिकारी तथा
मा. अध्यक्ष, पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदल.
विषयः पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्या मासिक बैठकीबाबत..
संदर्भः शासन निर्णय क्रमांक: सीएलए-२००९/(४)/काम-४, दि. २ मार्च २००९.
आदरणीय महोदय,
आम्ही बालहक्क कृती समिती, पुणे यांच्या वतीने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक: सीएलए-२००९/(४)/काम-४, दि. २ मार्च २००९ मधील कलम ३ नुसार आपल्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्या मासिक बैठकीस आम्ही स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी म्हणून उपस्थित रहात असून, मार्च २०२३ व एप्रिल २०२३ या दोन महिन्यांमध्ये कृतीदलाची बैठक झालेली नाही.
पुणे शहर व जिल्ह्यामध्ये बाल कामगार व त्यासंबंधी समस्या वाढत असून, कृतीदलाच्या मासिक बैठकीमध्ये यावर चर्चा होणे आवश्यक आहे. कामगार विभाग, पोलिस, शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकास तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.
तरी, माहे एप्रिल २०२३ साठी कृतीदलाची मासिक बैठक आयोजित करण्यासंबंधी योग्य ते आदेश निर्गमित करावेत, ही विनंती.
आपले नम्र,
बालहक्क कृती समिती, पुणे
ईमेल: arcpune09@gmail.com
प्रत –
१. मा. निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे.
२. मा. सहाय्यक कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, पुणे जिल्हा बाल कामगार कृतीदल.
No comments:
Post a Comment