कोणत्याही कारणाने शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या किंवा शाळेतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रायव्हेट स्टुडंट म्हणून १७ नंबरचा फॉर्म भरता येतो. गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना किंवा शाळेमध्ये कागदपत्रे जमा करताना अडचणी येत होत्या, शाळेकडून अतिरिक्त शुल्क मागितले जात होते.
'बालहक्क कृती समिती'तर्फे आपण हा मुद्दा विभागीय व राज्य बोर्डाच्या अधिकाऱ्यांपर्यंत नेला, पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव मांडायची संधी दिली. यानंतर बोर्डाने सर्व शाळांना अतिरिक्त शुल्क न घेण्याबाबत नोटीस पाठवली.
याबद्दलची संपूर्ण माहिती या लिंकवर मिळेल -
या पत्रकार परिषदेला येऊन आपले अनुभव मांडणारे, तसेच समितीच्या हस्तक्षेपानंतर शाळेमध्ये अर्ज जमा करू शकलेले सर्व विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेत पास झाले आहेत. त्या सर्वांचे समितीतर्फे अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा!
या वर्षीदेखील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात काही अडचणी येत असतील, तर 'बालहक्क कृती समिती'च्या माध्यमातून आपण नक्की मदत करू.
संपर्क: arcpune09@gmail.com
No comments:
Post a Comment